शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर चे प्रसिद्ध बाल रोग तज्ञ कृष्णकुमार चोथानी व साई भक्त विजय कोते यांच्या पुढाकाराने लवकरच साई संस्थान सुरू करणार लहान मुलांसाठी कोविड सेंटर

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर चे प्रसिद्ध बाल रोग तज्ञ कृष्णकुमार चोथानी व साई भक्त विजय कोते यांच्या पुढाकाराने लवकरच साई संस्थान सुरू करणार लहान मुलांसाठी कोविड सेंटर

श्रीरामपूर चे प्रसिद्ध बाल रोग तज्ञ कृष्णकुमार चोथानी व साई भक्त विजय कोते यांच्या पुढाकाराने लवकरच साई संस्थान सुरू करणार लहान मुलांसाठी कोविड सेंटर...

शिर्डी शहर प्रतिनिधी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन साईबाबा संस्थान ने लहान मुलांसाठी सुसज्ज 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ कृष्णकुमार चोथानी तसेच शिर्डीतील साई भक्त विजय तुळशीराम कोते यांनी पुढाकार घेऊन साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांच्यामध्ये तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वतयारी व उपाययोजना या बाबत चर्चा करण्यात आली. 

        राज्यातील नावलौकिक प्राप्त असलेले प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कृष्णकुमार चोथाणी यांचा बालरोग उपचारातील हातखंडा व दिर्घ अनुभव व संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी संस्‍थानने डॅा.चोथाणी यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्सची समिती स्थापन करून 100 बेडचे वैद्यकीय दृष्टया सर्व सोयीसुविधायुक्त परिपूर्ण सुसज्ज व अत्याधुनिक कोविड सेंटर उभारावे अशी मागणी साई भक्त विजय तुळशीराम कोते यांनी साईबाबा संस्थान कडे केली असता तात्काळ साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व बालरोगतज्ञ डॉ. कृष्णकुमार चोथानी यांनी आरोग्य विषयक चर्चासत्र घेऊन बालकांना संसर्ग झाल्यास त्यांची घ्यावयाची विशेष काळजी व करावयाचे औषध ऊपचार कीती गरजेचे आहे . याबाबतचे मार्गदर्शन संस्थांनच्या रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासनाला डॅा.चोथानी यांनी केले. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आपण पुरेसे सज्ज नसल्या कारणाने रुग्ण व नातेवाईकांची मोठी धावपळ झाली काहींना प्राणही गमवावे लागले तिसऱ्या लाटेच्या सामन्या पूर्वी आपण अलर्ट होणे गरजेचे आहे व लहान मुलांना या लाटेचा जास्त धोका होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यासाठी साईबाबा संस्थाने स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे अशी विनंती केली होती. तसेच श्रीरामपूर येथील तज्ञ डॉक्टर कृष्णकुमार चोथानी यांना या कोविड सेंटरमध्ये आपण बालकांना वैद्यकीयसेवा द्यावी आशी विनंती केली आसता दोघांनाही माझी विनंती व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावले उचलली असून लवकरच शिर्डीमध्ये सुसज्ज असे लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू होऊन शिर्डीतील तसेच परिसरातील लहमुलांना फायदा होणार असल्याचे साई भक्त विजय तुळशीराम कोते व दशरथ गव्हाणे यांनी सांगितले.