शिवप्रहार न्यूज-कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर सामूदायिक नमाजाला गेला...

शिवप्रहार न्यूज-कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर सामूदायिक नमाजाला गेला...

 चित्रकूट: उत्तर प्रदेशातल्या चित्रकूटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात ९४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातच नागरिक नियमांचं सर्रास उल्लंघन करत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. द्वारकापुरीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरनं दवाखाना सुरुच ठेवला आणि अनेकांवर उपचारदेखील केले.
 बिलाल अहमद असं कोरोनाग्रस्त डॉक्टरचं नाव असून द्वारकापुरीत त्यांचा दवाखाना आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरनं मास्क न लावता रुग्णांवर उपचार केले. त्याच्या दवाखान्यात आलेल्या अनेकांनीदेखील मास्क घातलेला नव्हता. इतकंच नव्हे तर दवाखान्यात रुग्णांना तपासल्यानंतर डॉक्टर त्याच इमारतीत सामुादायिक नमाज पठणासाठी गेला. तिथे जातानादेखील त्यानं मास्क घातलेला नव्हता. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर अगदी बिनदिक्कतपणे दवाखान्यात जात असताना, सामुदायिक नमाज पठण करत असताना प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. या डॉक्टरची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र त्यांनी डॉक्टरला क्वारंटाईन करण्याचे कष्टदेखील घेतले नाहीत. याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या आता ४९३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्ण सापडत असलेल्या इमारती प्रशासनाकडून सील केल्या जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्याची भीती आहे.