शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील भुयारी गटार भ्रष्टाचार गुन्ह्यातील दोन अधिकाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील भुयारी गटार भ्रष्टाचार गुन्ह्यातील दोन अधिकाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल…

श्रीरामपुरातील भुयारी गटार भ्रष्टाचार गुन्ह्यातील दोन अधिकाऱ्यांवर आणखी एक गुन्हा दाखल…

 श्रीरामपूर (प्रतिनिधी ) श्रीरामपूर नगरपालिकेने शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून निकृष्ठ भुयारी गटार प्रकल्पात कोट्यांवधींचा गैर व्यवहार केला. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा ,मुख्याधिकारी ,पालीकेचे अधिकारी यांच्यासह ठेकेदार व कंपनीवर गुन्हा दाखल झालेला होता. 

        याच गुन्ह्यातील आरोपी राजेन्द्र सुनावणे व सूर्यकांत गवळी या दोघांवर संगमनेर नगर पालीकेची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.विषेश बाब म्हणजे श्रीरामपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संगमनेर शहर पोलीसात काल फिर्याद दिल्या वरून आरोपी राजेन्द्र सुनावणे ,नगर अभियंता,संगमनेर नगरपरिषद व सुर्यकांत गवळी ,कनिष्ठ अभियंता ,संगमनेर नगरपरिषद यांच्या विरुद्ध भादवि कलम ४२०, ५११ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

        आरोपी सुतावणे व गवळी यांनी संगनमत करून संगमनेर नगर परिषद हद्दीतील अमरधाम सुशोभीकरन व नुतणीकरण टप्पा क्र 2 व ३ मधील कामे निविदे पूर्वीच केलेली असतांना अहवाल सादर न करताच निविदा काढून पालिकेची फसवणुकीचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे याकामी सहाय्यक बांधकाम अभियंता सा.बां. संगमनेर चे सौरभ पाटील यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांना दिला होता. 

         मग जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते ! आता पुन्हा श्रीरामपूर नगर पालीकेच्या २ माजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने श्रीरामपूरात चर्चेला उधान आले आहे .