शिवप्रहार न्यूज- नेवासा फाट्यावर ऍसिड टाकीचा स्फोट ! ०४ जखमी !गुन्हा दाखल !
नेवासा फाट्यावर ऍसिड टाकीचा स्फोट ! ०४ जखमी !गुन्हा दाखल !
नेवासा (शिवप्रहार न्यूज )प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे असलेल्या भांगे ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ऍसिड टाकीला होल पडलेले होते.हे होल ( छींद्र ) वेल्डिंग करण्यासाठी मजूर-कामगारांना कंपनीचा मॅनेजर व तेथील लोकांनी बोलवले.
टाकीत ऍसिड शिल्लक असतानाही टाकीच्या होलला वेल्डिंग करायला लावून टाकीतील ऍसिड मुळे तापमान वाढून या ऍसिड टाकीचा प्रचंड स्फोट झाला.या भीषण स्पोटात किशोर मच्छिंद्र कांडेकर ,वय 26 धंदा-मजुरी, राहणार -कांगोणी,तालुका नेवासा ,नंदू हरिभाऊ गांगुर्डे ,महेश दशरथ माळी,आशिष हिरालाल जयस्वाल हे चौघे जण गंभीर जखमी झाले.ही भीषण घटना काल १०-३०च्या सुमारास भांगे अर्गोनिक केमिकल कंपनीत घडली.
घटनेची खबर मिळताच नेवासाची पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तातडीना घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.जखमी किशोर मच्छिंद्र कांडेकर या मजुराच्या फिर्यादीवरून कंपनीचा मॅनेजर व आरोपी दीपक विजय तारडे, राहणार- ब्राह्मणी ,महेश चंद्रशेखर सालके,राहणार -पुणे ,हल्ली राहणार- नेवासा फाटा ,अन्वर शेख ,राहणार -आष्टी,जिल्हा बीड व प्लांट इन्चार्ज राजेंद्र धनाजी फुरडे ,राहणार उस्मानाबाद ,हल्ली रा-नेवासा फाटा यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात भादवी कलम 284 ,285 ,286 ,336 ,337, 338 ,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विजय करे हे स्वतः या गंभीर प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
कंपनी व तेथील लोकांच्या बेरजबाबदारपणामुळे चार गरीब मजूर तरुण गंभीर जखमी झाले .