शिवप्रहार न्यूज - धर्मातराच्या निषेधार्थ तसेच धर्मातरण बंदीबाबत हिंदु बांधवांच्या वतीने निवेदन…
धर्मातराच्या निषेधार्थ तसेच धर्मातरण बंदीबाबत हिंदु बांधवांच्या वतीने निवेदन…
नगर -( पुण्यश्लोक आहिल्यादेवीनगर ) जिल्ह्यातील हिंदुंच्या होत असलेल्या ख्रिश्चन धर्मातरांच्या निषेधार्थ तसेच धर्मातरण बंदीबाबत श्रीरामपुर तालुक्यातील समस्त हिंदु बांधवांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले,
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे, की राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील बळजबरीने पंजाब येथील पास्टर कमलसिंग याच्या नेतृत्वाखाली धर्मातरांचे काम वेग धरत आहे.सदर इसमाला राजकीय तसेच पोलिस यंत्रणेचे पाठबळ मिळत असल्याने त्याची मजल पंजाब ते नगर ( पुण्यश्लोक आहिल्यादेवीनगर ) पर्यंत पोहचली आहे.सदर इसमाने जास्तीत जास्त धर्मांतरण करुण हिंदु समाजात कशी भरूण न निघणारी पोकळी निर्माण करता येईल एवढे क्रुर विचार मनात ठेऊन सातत्याने प्रयत्न सुरु आहे, सदर इसम हा फक्त हिंदु समाजालाच नव्हे तर देशाला सुध्दा घातकी असुन या व्यक्ती विरुद्ध कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे.तसेच या इसमाला पाठबळ देणारे पुढारी , पोलीस व इतर घटकांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे, त्यासाठी धर्मांतरण विरोधी कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या निवेदनावर सुरज कोकणे, सिध्दार्थ गलांडे, पांडुरंग पटारे, ॠषिकेश चौधरी, हर्षद गलांडे, राजेंद्र शिंदे, सुदाम पटारे, राहुल नागुडे, यशोधन काळे, सिध्दार्थ पारधे, गणेश औटी, महेश भुमकर आदींच्या सह्या आहेत.