शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात खाजगी सावकाराच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाचा गळफास...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात खाजगी सावकाराच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाचा गळफास...

श्रीरामपुरात खाजगी सावकाराच्या व्याजाच्या तगाद्याला कंटाळून तरुणाचा गळफास...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील एका दुकानात काम करणाऱ्या तरुणाने एका खाजगी सावकाराच्या व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    सरस्वती कॉलनी येथे राहणारा स्वप्निल पुरुषोत्तम तुपे याने आनंद पाटील याच्याकडून पंधरा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात त्याने गाडीसह इतर वस्तू गहाण ठेवल्या होत्या. आनंद पाटील याने स्वप्निलच्या घरी जाऊन 'गाडी विक आणि मला पैसे लवकर दे, नाहीतर पुढे काय होईल.. बघून घे' असा दम दिला होता. स्वप्निलच्या आईने त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता मी सगळे पैसे दिले आहेत, तरी मला अजून पैसे मागत आहे, त्यामुळे मला टेन्शन आले आहे. असे त्यानी सांगितले होते. 

       याच पैशाच्या तागाद्याला कंटाळून त्याने रविवारी दुपारी घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी स्वप्निलच्या आईने पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आनंद पाटील याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीसात भादवी कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.