शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर विधानसभेसाठी 88 अर्ज विक्री…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर विधानसभेसाठी 88 अर्ज विक्री…

श्रीरामपूर विधानसभेसाठी 88 अर्ज विक्री…

श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत एकूण 88 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. हे अर्ज 48 व्यक्तींनी नेले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.परंतु आज रोजी पर्यंत एकही अर्ज नामनिर्देशन पत्र स्वरूपात दाखल झालेला नाही.कारण अद्यापपर्यंत महाविकास आघाडी व महायुती यांच्याकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही.

      इतरही छोट्या- मोठ्या पक्षांकडून अद्यापपर्यंत उमेदवार घोषित झालेले नसल्याने नामनिर्देशनपत्र मात्र कोणीही भरून जमा केलेले नाही.अर्जाच्या एव्हढ्या मोठ्या संख्येवरुन असे दिसते की,श्रीरामपुरात अनेक इच्छुक आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहे.