शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या जागेवर आरपीआयचाही आग्रह कायम…
श्रीरामपूरच्या जागेवर आरपीआयचाही आग्रह कायम…
श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीतील शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच चालू असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी देखील मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला आहे. तसेच आरपीआयने असा इशारा दिलेला आहे की,विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा दिल्या नाही तर ते महायुतीचा प्रचार करणार नाहीत.
श्रीरामपूर या राखीव मतदारसंघासह मुंबईतील धारावी,चेंबूर मतदार संघ इत्यादी मतदारसंघाची मागणी आरपीआयने महायुतीकडे लावून धरली आहे.यामुळे श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रचंड चुरस महायुतीमध्ये असल्याचे दिसते.तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार कानडे आणि ओगले यांच्यातच स्पर्धा आहे.तसेच ओगले हे शिंदेसेनेकडुनही लढण्यास तयार असल्याचे समजत आहे.