शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात फटाक्याचे दुकान जाळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल...
श्रीरामपुरात फटाक्याचे दुकान जाळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील थत्ते ग्राउंड येथे दिवाळीनिमित्त लावलेले मनोज प्रकाश चिंतामणी यांचे 27 नंबरचे दुकान जाळल्याप्रकरणी चौघा जणांवर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस राजू मोरे, साहिल दत्तात्रय पाटेकर, अनिकेत डफळ, यश सुरेश बिराजदार या चौघांनी थत्ते ग्राऊंडवरील चिंतामणी यांच्या दुकानाजवळ येऊन फटाके उधार न दिल्याच्या रागातून रात्री २ वाजता पेट्रोलच्या व लाईटर च्या साहाय्याने फटाक्याचे दुकान पेटवून दिले. त्यामुळे दुकानातील दोन लाख 87 हजार रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे फटाकडे तसेच 25 हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.
याप्रकरणी मनोज चिंतामणी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून दुकान पेटवणारे तेजस राजू मोरे, साहिल दत्तात्रय पाटेकर, अनिकेत डफळ, यश सुरेश बिराजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.