शिवप्रहार न्यूज-प्रचंड कटकटीनंतर पाळणा हलला पण रामनवमीत लाईट गेली;श्रीरामपूरकरांची थट्टा सुरूच...

शिवप्रहार न्यूज-प्रचंड कटकटीनंतर पाळणा हलला पण रामनवमीत लाईट गेली;श्रीरामपूरकरांची थट्टा सुरूच...

प्रचंड कटकटीनंतर पाळणा हलला पण रामनवमीत लाईट गेली;श्रीरामपूरकरांची थट्टा सुरूच...

श्रीरामपूर-

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेली श्रीरामपूरची श्रीरामनवमी यात्रा यावर्षी पाळण्याच्या ठेक्यावरून प्रचंड वादात अडकली होती.आठ -पंधरा दिवसापासून पाळण्याच्या ठेक्यावरून दोन गटात प्रचंड कटकटी चालू होत्या.एक गट थत्ते मैदानसाठी आग्रही होता तर दुसरा गट रासकरनगर साठी आग्रही होता. या वादामध्ये पाळण्यावाल्यांना दमदाटी देखील झाली.या दोन गटातील वाद कमी झाल्यावर रासकरनगर येथे यात्रा सुरू झाली आहे. ही रामनवमी यात्रा सुरू असतानाच आज शनिवारी ऐन रामनवमीत सकाळपासुन वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

           वैयक्तिक स्वार्थासाठी झालेल्या पाळण्याच्या ठेक्याच्या कटकटी आणि त्यात आज महावितरणने रामनवमीच्या सणासुदीत वीज न देणे व नगरपालिकेकडून पाणी पुरवठा देखील न मिळणे यामुळे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांकडून संताप व्यक्त होत आहे. 

       इतर समाजाच्या सणासुदीच्या काळात जर वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत होतो.तर श्रीरामपूरचा क्रमांक एकचा उत्सव असलेल्या श्रीरामनवमी या सणाच्या काळात पाणीपुरवठा व वीजपुरवठा का सुरळीत केला जात नाही ? असा सवाल श्रीरामपुरातील श्रीरामभक्त विचारत आहेत.शासनाने सर्व समाजाला समान न्याय द्यावा.असा भेदभाव होणार असेल आणि श्रीराम भक्तांच्या भावनांची अशी थट्टा होणार असेल तर या विरोधात सामान्य श्रीरामपुरातील श्रीरामभक्तांकडुन आवाज उठवला जाईल.