शिवप्रहार न्यूज- तरुणांना मास्क घालण्यास सांगणाऱ्या ग्रामसेवकाला झाली शिवीगाळ;श्रीरामपूर तालुक्यातील घटना.

तरुणांना मास्क घालण्यास सांगणाऱ्या ग्रामसेवकाला झाली शिवीगाळ;श्रीरामपूर तालुक्यातील घटना...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत येथे नेमणुकीस असलेले ग्रामसेवक श्री.समीर लालाभाई मणियार,वय -३७, व्यवसाय-ग्रामसेवक एकलहरे ग्रामपंचायत,राहणार -फातेमा हाउसिंग सोसायटी ,श्रीरामपूर शहर हे एकलहरे गावात ग्रामपंचायत हद्दीमध्ये काल २५/०५/२०२१ रोजी दुपारी कोरोना कर्तव्य करत असताना गावातील आटवाडी भागात राहणारे दोन तरुण त्यांना विना मास्क फिरताना दिसले. म्हणून ग्रामसेवक श्री.मणियार यांनी या दोघांना कोरोना नियमांचे पालन करुन मास्क घालण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्याचा या दोन तरुणांना राग आल्याने या दोघांनी ग्रामसेवक श्री.मणियार यांना शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकारावरून श्री.समीर लालाभाई मणियार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ०१) सौरभ अशोक पवार व ०२) प्रशांत अशोक पवार ,राहणार-आटवाडी,एकलहरे,तालुका-श्रीरामपूर या दोघांविरोधात गुन्हा नोंद क्रमांक 697/ 2021 भादवि कलम 188, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची काल एकलहरे गाव परिसरात दिवसभर जोरदार चर्चा चालु होती. तरी या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.घायवट हे पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.