शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात मा.नगरसेविकेच्या पतीच्या सेतु कार्यालयामध्ये भ्रष्टाचार;महिलेने चप्पल कानफडात मारली …

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात मा.नगरसेविकेच्या पतीच्या सेतु कार्यालयामध्ये भ्रष्टाचार;महिलेने चप्पल कानफडात मारली …

श्रीरामपुरात मा.नगरसेविकेच्या पतीच्या सेतु कार्यालयामध्ये भ्रष्टाचार;महिलेने चप्पल कानफडात मारली …

श्रीरामपूर- येथील मा.नगरसेविकेच्या पतीच्या सेतु कार्यालयामध्ये गोर गरिबांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या कामाला नियमाप्रमाणे पन्नास रुपये लागतात त्या कामाचे दोन हजार रुपये घेऊन खुलेआमपणे गोरगरीब जनतेची लुट नगरपालिकेजवळील सेतू कार्यालयातून होत आहे. शेतमजूर कष्टकरी काम करणाऱ्या महिलेकडून सेतु वाला ५० रुपयाच्या कामाचे २,००० रुपये घेतो व आधार कार्ड वेळेवर न दिल्याने चिडलेल्या महिलेने सेतू कार्यालयात असलेल्या नगरसेविकेचा पती व तेथील कामगार यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. हा विषय वाढतोय आणि मोबाईलचे शुटींग सुरू आहे हे लक्षात येताच नगरसेविकेचा पती "तुम्ही दोघे बघून घ्या"(महिला व कामगार) असे म्हणून काढता पाय घेतो.    

          त्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तीस महिला चपलेने चोप देऊन अद्दल घडविते. नकळत हजारो गोरगरीब लोकांची आर्थिक लूट सेतू कार्यालकडून केली जात आहे. अशा खुलेआमपणे लूटमार करणाऱ्या या सेतू कार्यालयावर प्रांत-अधिकारी, तहसीलदार काही कारवाई करतात का? याकडे लक्ष लागले आहे.

         हा प्रकार लहुजी शक्ती सेनेचे सागर भोंडगे यांनी उघडकीस आणला.