शिवप्रहार न्यूज -टाकळीभानच्या रावसाहेबने केला तरुणीचा विनयभंग.
टाकळीभानच्या रावसाहेबने केला तरुणीचा विनयभंग...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या गावामध्ये एका तरुण महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,आरोपी रावसाहेब सीताराम शिनगारे,वय 40 ,राहणार-दाभाडे वस्ती ,टाकळीभान याने लहान मुलाच्या भांडणाच्या कारणावरून पीडित महिला फिर्यादीच्या घरासमोर येऊन शर्टाचे बटन काढून, पीडित महिलेला अश्लील भाषेत बोलून ,फिर्यादीचा हात धरून तिचा विनयभंग केला.
यावरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आरोपी रावसाहेब यांना तात्काळ अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख करत आहे.