शिवप्रहार न्यूज- सरकारच्या आशीर्वादाने गोर-गरीब नाभिक उपाशी असुन ही एक कटू सत्यता आहे-नाभिक समाज युवासेना अध्यक्ष...

शिवप्रहार न्यूज-  सरकारच्या आशीर्वादाने गोर-गरीब नाभिक उपाशी असुन ही एक कटू सत्यता आहे-नाभिक समाज युवासेना अध्यक्ष...

सरकारच्या आशीर्वादाने गोर-गरीब नाभिक उपाशी असुन ही एक कटू सत्यता आहे-नाभिक समाज युवासेना अध्यक्ष...

श्रीरामपूर-

पहिल्या lockdown मध्ये नाभिक उपाशी मेलाच पण आता या lockdown मध्ये तर त्याहुन वाईट अवस्था झाली असुन त्यामुळे काही नाभिक आत्महत्या करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा समाज आज रस्त्यावर आला आहे याचे सरकारला भान नाही. आता या समाजाची पूर्ण जबाबदारी सरकारवर आहे.

lockdown मध्ये या समाजावर आर्थिक परिस्थिती चा बोजा इतका वाढला कि उस्मानाबाद येथील एका नाभिकाने आत्महत्या केली.

एवढेच नही तर राहता तालुक्यात एका नाभिकाचे घर जळून खाक झाले, त्यावेळी समाजाने वर्गणी करून या परिवारास कसे बसे सावरले.यावेळी अनेक नेते मंडळींचे दरवाजे थोठावले परंतु कोणीही मदतीचा हाथ पुढे केला नाही.यावेळी नाभिक जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांनी सर्व नाभिकांना घेऊन वर्गणी केली.

या काळात नाभिकांवर बँक, बचत गट, उसने घेतलेले पैसे याप्रमाणे कर्ज आहे तर दुसरीकडे घर देखील चालवायचे आहे हे असे दुहेरी संकट असताना सरकारने अचानक पंच तारांकित हॉटेल, चित्रपट गृह, त्यांनतर डायरेक्ट सलून दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले, सरकारला समजले पाहिजे कि नाभिक हा हातावर पोट भरणारा गट आहे. तुम्ही पंच तारांकित हॉटेल,बार रेस्टोरंट,नंतर एक छोटा व्यवसाय बंद करून टाकला. या वर कोणी आवाज उठवला तर तुम्ही त्यास लाठीने मृत्युमुखी पाडत आहे.

हे असामाजिक काम जर दुसऱ्या समजाबाबत केले असते तर तो समाज रस्त्यावर आला असता परंतु नाभिक हे संयम ठेवुन आहेत.

नाभिकचे इतके दुर्दव्य कि मागच्या lockdown मध्ये गोर गरीब नाभिकांना नगर येथे आमरण उपोषण करावे लागले. त्यावेळी यांना प्रशासनाने काही सवलती दिल्या, त्यातून उभारण्याचा प्रयत्न केला तर दुसरे lockdown लावले त्यात सरकाने विचार केला नाही कि खेड्या, वस्त्यांवर छोट्या छोट्या टपऱ्या ठेऊन नाभिक पोट भरतो यांनी फक्त आणि फक्त मोठं मोठे spa, beauty parlour, समोर ठेऊन या नाभिकांना उपाशी ठेवले आहे.यासाठी सरकार आणि विरोधी पक्ष नेते जबाबदार आहे. हे असे झाले कि सरकार नाभिकांचे नाक आणि तोंड संगच दाबून बुक्क्या मारत आहे. सरकारने यावर उपाय तर दूर परंतु आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी काल परवा आर्थिक मदत जाहीर केली याकडे सर्व नाभिक आतुरतेने आस लावून बघत होते कि,आता तरी आम्हाला काहीतरी मदत मिळणार सरकारकडून तेथेही निराशाजनक वाटी आली.

परंतु सगळ्याच सरकार प्रमाणे हे सरकार देखील फक्त नाभिकाचा उपयोग निवडणूकी पुरता करत आहे. जसे 2009 मध्ये नाभिक समाजाचे अनुसूचित जाती मध्ये प्रवेश करण्यासाठी चे आंदोलन त्यावेळच्या सरकारने उधळून लावले आणि नाभिकन्ना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले.(विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्र आणि केरळ राज्य वगळता नाभिक सर्व राज्यमध्ये sc मध्ये येतो.) 

      याबाबत सांगायचे एवढेच आहे कि जो नाभिक समाज इतिहासाच्या प्रत्येक भागात तुम्हाला समाजकामामध्ये कायम अग्रेसर दिसेल.त्या समाजाला आज सरकार उपाशी मारत आहेच अन् आत्महत्येस पण प्रवृत्त करत आहे.पण नाभिक समाज देखील खूप हुशार आहे निवडणुकीतून याचे उत्तर नक्की देईल.

श्रीरामपूर तालुका नाभिक युवासेना अध्यक्ष- दिपक संत.