शिवप्रहार न्यूज -जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण..
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण...
बेलापूर- जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातील व्याजाच्या रकमेतून बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नातून 13 लाख 15 हजार रुपयांची रुग्णवाहिका आज लोकार्पण करण्यात आली. जिल्हा परिषद 14 वित्त आयोगातील व्याजाच्या रकमेतून पाच कोटी 85 लाख रुपयांचा निधी सर्वसाधारण सभेत मंजूर करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधी खर्चास शासन स्तरावर मान्यता मिळवून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक,निमगाव खैरी,माळवाडगाव या आरोग्य केंद्रास ॲम्बुलन्स देण्यात आली आहे. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ,जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके ,आमदार लहू कानडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ,डी एच ओ डॉक्टर सांगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली.
आज सकाळी बेलापूर बुद्रुक मधील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,डॉक्टर भारत काळे ,डॉक्टर निर्मळ, डॉक्टर सुधीर काळे ,डॉक्टर रवींद्र गंगवाल,जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे डॉक्टर चोखर ,संतोष शेलार ,सरपंच महेंद्र साळवी,रणजीत श्रीगोड,अजय डाकले,विशाल अंबेकर ,बाळासाहेब दाणी,पोलीस पाटील अशोक प्रधान,पत्रकार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.