शिवप्रहार न्युज - "परत गल्लीत यायचे नाही" म्हणत श्रीरामपुरात महिलेला मारहाण...

शिवप्रहार न्युज -  "परत गल्लीत यायचे नाही" म्हणत श्रीरामपुरात महिलेला मारहाण...

"परत गल्लीत यायचे नाही" म्हणत श्रीरामपुरात महिलेला मारहाण...

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -श्रीरामपूर शहरात किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

        याबाबत वैशाली दत्ता बारवाल, रा.आदर्शनगर, वॉर्ड नं.१, श्रीरामपूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी ४ वा. गोंधवणी पुलावरून घरी येत असताना आरोपी हे हातात लोखंडी रॉड घेवून आले व त्यांनी रॉडने फटका मारत तू परत या गल्लीत यायचे नाही,परत आले तर जिवे मारु,अशी धमकी देत, शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

        दरम्यान वैशाली बारवाल यांच्या फिर्यादीवरून राजू मोरे, रत्ना मोरे, प्रेम मोरे, राणी गोसावी यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.