शिवप्रहार न्यूज -अपना धंदा डर पे चलता है.... कोरोना महामारीत सर्वसामान्यांची कशी लुटालुट होत असणार याबाबत सांगताहेत एक युवा शास्रज्ञ...

अपना धंदा डर पे चलता है....

कोरोना महामारीत सर्वसामान्यांची कशी लुटालुट होत असणार याबाबत सांगताहेत एक युवा शास्रज्ञ...

श्रीरामपूर- सध्या कोरोना महामारी चा अतिशय वाईट काळ चालु आहे. या वाईट काळात वैद्यकीय क्षेत्रातील काही वाईट मनसुबे बाळगणारी मंडळी कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची लुटालुट करत आहे याबाबत भारत सरकार च्या आयसर,पुणे या संस्थेतील युवा शास्रज्ञ अवधुत जाधव यांनी एका व्हिडीओ व्दारे ही माहीती दिली आहे.कोरोना चाचणी साठी राज्यभर कसे वेगवेगळे रेट आकारले जातात,जास्तीत जास्त लोकांना कसे स्कॅनिंग इतर चाचण्या करायला लावल्या जातात,लोकांना मरणाचे जे भय आहे त्याचा कसा फायदा घेतला जात असावा याबाबतची माहीती या व्हिडीओमध्ये सांगितलेली आहे.

       तसेच जाणकारांना पुर्वीपासुन माहीत आहे की,काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींमुळे वैद्यकीय क्षेत्र कसे डागाळले आहे. जसे काही वैद्यकीय मंडळींचे MR मार्फत फार्मा कंपन्यांशी साटेलोटे आहे त्यातुन महागडी औषध घ्यायला कसे भाग पाडले जाते,काही आजार नसला तरी लॅब वाल्याला हाताशी धरुन लॅब मध्ये वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगणे,सध्या कोरोना नसला तरी काही जण सरसकट कोरोनाच्या महागड्या गोळ्या-औषधे चिठ्ठीवर लिहुन देण्याचे काम काही लोक करत आहे.याला अपवाद नक्कीच अनेक जण आहेत जे देवासारखे नाममात्र दरात काम करत आहेत. जसे सगळ्याच क्षेत्रात काही चांगले आणि काही वाईट लोक असतात तसेच वैद्यकीय क्षेत्र या सेवेचे देखील झाले आहे. त्यामुळेच ‘अपना धंदा डर पे चलता है...’ हा एका अंडर्वल्ड वरील सिनेमाचा डायलॅाग आठवला तर नवल नसावे.

युवा शास्त्रज्ञ अवधुत जाधव यांचा व्हिडीओ बातमीसोबत जोडण्यात आलेला आहे.