शिवप्रहार न्यूज-पुणतांबा ग्रामपंचायतीने गोदावरी घाटावरील दशक्रिया विधीवर घातली बंदी.

शिवप्रहार न्यूज-पुणतांबा ग्रामपंचायतीने गोदावरी घाटावरील दशक्रिया विधीवर घातली बंदी.

पुणतांबा ग्रामपंचायतीने गोदावरी घाटावरील दशक्रिया विधीवर घातली बंदी...


श्रीरामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी राहता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतीने दशक्रिया विधीवर बंद घातलीआहे . नियमांचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणतांबा ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.ग्रामपंचायतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले कि, गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत.पुणतांबा हे तीर्थशेत्र असल्यामुळे चांगदेव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर मयत व्यक्तींचे दशक्रिया विधी होत असतात. तरी दशक्रिया विधी करणारे नागरिक नियमांचे पालन करत नाहीत.त्यामळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणुन ग्रामपंचायतीने दशक्रिया विधी व इतर धार्मिक विधीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या नियमांचे उल्लघन केल्यास दशक्रिया विधी करणाऱ्या पुरोहीतावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल,तसेच दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकाकडून १० हजार रुपये दंड वसुल कारण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पटाईत यांनी दिली आहे.