शिवप्रहार न्यूज- कामगार रुग्णालयात उपचारादरम्यान भारत या तरुणाचा मृत्यू...
कामगार रुग्णालयात उपचारादरम्यान भारत या तरुणाचा मृत्यू...
बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील नरसाळी येथील तरूण भारत बाबू फुलमाळी, वय-२५ हा केशव गोविंद बन, बेलापूर खुर्द या परिसरात असताना त्याला काहीतरी चावल्याने त्याला उपचारासाठी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे उपचार सुरू असताना भारत फुलमाळी याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या खबरीवरून शहर पोलिसात अंकस्मात मृत्यूची काल नोंद करण्यात आली असून भारत फुलमाळी याला नेमके काय चावले? याचा पुढील तपास पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. पंडीत हे करीत आहेत.