शिवप्रहार न्यूज -नाशकात झाकीर हुसेन रुग्णालयात आॅक्सीजन गळती होवुन २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू ...
नाशकात झाकीर हुसेन रुग्णालयात आॅक्सीजन गळती होवुन २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू ...
नाशिक - नाशिक मधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन टँकर फुटल्यामुळे आॅक्सीजन पुरवठा लिंक होवुन 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गळतीमुळे रुग्णालयात 30 मिनिटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार अनेक लोकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळ्यामुळे या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हुसेन रुग्णालयात सुमारे 171 रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आलेले आहेत. अग्निशमन दल या घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातास जो जबाबदार असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.