शिवप्रहार न्यूज-अशोक लेलँड ला बनावट आरटीओ नंबर लावणारे श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात...

अशोक लेलँड ला बनावट आरटीओ नंबर लावणारे श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील आरटीओ कार्यालयांमध्ये अशोक लेलँड कंपनीच्या वाहनाला बनावट रजिस्ट्रेशन नंबर एमएच-17 बिडी 21 78 हा लावून हा बनावट नंबर आरटीओ कार्यालयाकडून पासिंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणून दोन आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई सुनील दिघे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञान प्रकाश मिश्रा,राहणार -उत्तर प्रदेश व आरोपी नासीर , राहणार औरंगाबाद या दोघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच एकाला अटक देखील झाली आहे.
शासनाची दिशाभूल करून, बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याची ही घटना आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरवडे करीत आहेत.