शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या...
श्रीरामपुरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर परिसरामध्ये दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागातील नेनो रो हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे किरण नंदकुमार कटके, वय 27 वर्ष,या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली.
तर दुसर्या घटनेत अरविंद मोतीलाल यादव,वय -पंचवीस वर्ष ,राहणार -फुले आंबेडकर नगर ,दत्तनगर ,श्रीरामपूर या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन स्वताची अंत्ययात्रा संपवली.या दोन्ही तरुणांना उपचार कामी शहरातील कामगार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.परंतु साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.
याबाबत पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार व पोलीस नाईक शेलार हे करीत आहेत.