शिवप्रहार न्यूज- बेलापूरचे २२ वर्ष सरपंचपद भुषवणार्या कै.मुरलीधर खटोड यांना स्मृतीदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन...
बेलापूरचे २२ वर्ष सरपंचपद भुषवणार्या कै.मुरलीधर खटोड यांना स्मृतीदिनानिमित्त करण्यात आले अभिवादन...
बेलापुर(दिलीप दायमा)- कै.मुरलीधर खटोड यांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत आपल्याला असेच सुरु ठेवायचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावात सर्वांच्या सहकार्याने कोवीड सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहीती माजी सरपंच भरत साळुंके यांनी दिली.
बेलापुरगावाचे सलग २२ वर्ष सरपंचपद भूषविणारे कै.मुरलीधर खटोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समीती सदस्य अरुण पा.नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपस्थित होते. आपल्या भाषणात पं.स.सदस्य अरुण पा.नाईक म्हणाले की, कै.मुरलीधर खटोड यांचा सत्कार्याचा वसा ग्रामस्थांनी पुढे चालु ठेवला. दर वर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमीत्त काहीना काही समाज उपयोगी कार्यक्रम राबवीले जातात. कोरोना महामारीच्या काळात भरत साळुंके, रविंद्र खटोड आणि त्यांच्या सर्व टिमने कोविड केअर सेंटर सुरु करुन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या वेळी केशव गोविंद बनाचे ट्रस्टी बापुसाहेब पुजारी म्हणाले की, कोविड सेंटर ही गरज ओळखुन गावात कोवीड सेंटर सुरु करण्यात आले. या ठिकाणी जागा अपुरी पडल्यास आपण केशव गोविंद बनात देखील व्यवस्था करण्यास तयार असल्याचे सांगितले. दिपक क्षत्रीय यांनी समाजसेवक कै.मुरलीधर खटोड यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करुन एखादे भव्य असे हॉस्पीटल या परिसरात उभे करावे, अशी सुचना केली त्यास व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा यांनी अनुमोदन दिले. या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी बेलापुर ग्रामपंचायतीत काम करणार्या सर्व ६० कर्मचाऱ्यांचा विमा उतरुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कोवीड सेंटर चालविणारे कार्येकर्ते स्वयसेवक, कर्मचारी, पोलीस पाटील अशोक प्रधान व विजय दुशींग यांचा देखील विमा उतरविण्यात आल्याची माहीती भरत साळुंके यांनी दिली. तसेच कोवीड सेंटरला मदत करणार्या असंख्य दाते, संस्था, संघटना तसेच सेवा देणारे डॉ.राशिनकर, डॉ.शैलेश पवार यांचेही अभिनंदन करण्यात आले. या वेळी विलास मेहेत्रे, अनिल पवार, राम पोळ, दिवाकर कोळसे, दादासाहेब जाधव, रामनाथ शिंदे, प्रसाद खरात, अशोक प्रधान, शिवाजी वाबळे, पप्पु कुलथे, रमेश कुटे, सचिन कडेकर, हरीभाऊ वावळे, किशोर राऊत, संजय नागले, सचिन मेहेत्रे, गणेश साळुंके, आनंद दायमा, अकबर टिन मेकरवाले शाकीर बागवान, विजय शेलार, बद्रिनारायण शर्मा, अशोक पवार, दै.जय बाबाचे दिलीप दायमा, अरविंद शहाणे, प्रशांत बिहाणी, मनोज दायमा, किशोर कदम, प्रकाश कुर्हे, कांतीलाला मुथा आदि उपस्थित होते.
कार्याक्रमाचे सूत्रसंचलन अभिजित रांका यांनी केले, तर रविंद्र खटोड यांनी आभार मानले.
यावेळी कै.मुरलीधर खटोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपल्या जिवाची काळजी न करता समाजात अहोरात्र झटणार्या बेलापूर येथील पोलिस, पत्रकारांचा विमा उतरविण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड व भरत साळुंके यांनी दिली. कोरोना काळात पत्राकारांचा विमा उतरविणारी कै.मुरलीधर खटोड पतसंस्था ही जिल्ह्यातील पहीली संस्था ठरली आहे.