शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात वडापाववाल्याच्या पोटात खुपसला चाकू
श्रीरामपूरात वडापाववाल्याच्या पोटात खुपसला चाकू
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) -आपले वडापावचे दुकान बंद करत असताना एका अनोळखी व्यक्तीने येवून पाण्याची बाटली मागत वडापाववाल्याच्या पोटात चाकू खुपसण्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरातील बस - स्टॅन्डसमोर असलेल्या स्वादीष्ट नाष्टा सेंटर येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र लालचंद केशरवाणी, वय- ४१, धंदा-नाष्टा सेंटर, रा. सरस्वती कॉलनी, वार्ड नं. ७ हे रविवार दि. २२ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास स्वादीष्ट नाष्टा/वडापाव सेंटर या आपल्या दुकानाचे सर्व काम उरकून दुकान बंद करत असताना एका अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानासमोर आला आणि त्यांना म्हणाला, मला पाणी पाहीजे. तेव्हा केशरवाणी त्याला म्हणाले पाण्याची बाटली १० रूपयांना आहे. तेव्हा त्याने त्याच्या कमरेजवळ हात घातला. तेव्हा केशरवाणी यांना वाटले की, तो पैसे काढत आहे. परंतु त्याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढला आणि केशरवाणी यांच्या डाव्या बाजूस कमरेखाली जोरात खुपसला. तेव्हा ते मोठयाने ओरडल्याने चाकू खुपसणारा तेथून पळून गेला. पळून गेलेल्याने तोंडाला पुर्णपणे स्टुप मास्क घातलेला होता. त्याचे केस बारीक होते. त्याने अंगात मळकट तपकिरी शर्ट, मळकट पॅन्ट घातलेली होती. जोरात. चाकू खुपसल्याने केशरवाणी यांचे खूप रक्त वाहू लागल्याने त्यांना ताबडतोब साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रूग्णालय येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी वरीलप्रमाणे राजेंद्र केशरवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३२४ प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई भरत पंडीत हे करीत आहेत.