शिवप्रहार न्यूज -आजपर्यंत झालेले नगर जिल्ह्यातील एकुण लसीकरण
आजपर्यंत झालेले नगर जिल्ह्यातील एकुण लसीकरण ...
नगर- जिल्ह्याला एकूण 8 लाख 530 डोस प्राप्त झाले होते.त्यापैकी आजपर्यंत एकूण 6 लाख 85 हजार 141 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 43 हजार 32 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 23 हजार 954 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 41 हजार 745 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 975 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 17 हजार 454 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 671 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
45 च्या पुढील 4 लाख 19 हजार 570 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 21 हजार 740 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.