शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात ४ जणांनी घेतले विष;कामगार रुग्णालयात उपचार सुरू…

श्रीरामपुरात ४ जणांनी घेतले विष;कामगार रुग्णालयात उपचार सुरू…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात राहणाऱ्या एकाच परिवारातील ०४ जणांनी आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या परिवारामधील परिवार प्रमुख व्यक्ती त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी अशांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकरणी कामगार रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,विष घेतलेले वरिल चारही पेशंट 24तास निगराणीखाली ठेवण्यात आलेले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहेत.
या घटनेमुळे गोंधवणी परिसरासह श्रीरामपूर शहरात खळबळ माजली आहे.नेमक्या कोणत्या कारणामुळे या परिवाराने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत पोलीस तपासानंतरच समजेल.