शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर पंचायत समिती बीडीओंच्या अनागोंदी कारभाराविरोधात ZP CEO कडे नेतेमंडळींची तक्रार…

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर पंचायत समिती बीडीओंच्या अनागोंदी कारभाराविरोधात ZP CEO कडे नेतेमंडळींची तक्रार…

श्रीरामपूर पंचायत समिती बीडीओंच्या अनागोंदी कारभाराविरोधात ZP CEO कडे नेतेमंडळींची तक्रार…

 श्रीरामपूर- श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी/BDO मच्छिंद्रनाथ धस यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात अनेक पंचायत समिती सदस्यांसह उपसभापती बाळासाहेब तोरणे व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली आहे.

    या तक्रार पत्रात म्हटले आहे की,पंचायत समितीमध्ये घरकुल,नरेगा ,स्वच्छ भारत ,दलित वस्ती व इतर योजनांतील कामे होण्यासाठी जनसामान्यांकडे आर्थिक मागणी केली जाते, असभ्य भाषा वापरली जाते. तसेच BDO यांच्या कडुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतो. इत्यादी आरोप गट विकास अधिकारी तथा BDO मच्छिंद्रनाथ धस यांच्यावर करण्यात आले आहेत.

      तसेच मच्छिंद्रनाथ धस हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन काम करत असून मंठा,जिल्हा-जालना येथे देखील त्यांनी अशाच प्रकारे काम केल्यामुळे त्यांची श्रीरामपूरला बदली करण्यात आली आहे असेही या तक्रार पत्रात म्हटले आहे.