शिवप्रहार न्यूज- अशोक कारखाना पुन्हा मुरकुटे यांच्या ताब्यात;सभासदांनी परिवर्तन नाकारले…

शिवप्रहार न्यूज- अशोक कारखाना पुन्हा मुरकुटे यांच्या ताब्यात;सभासदांनी परिवर्तन नाकारले…

अशोक कारखाना पुन्हा मुरकुटे यांच्या ताब्यात;सभासदांनी परिवर्तन नाकारले…

 श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा असणारा अशोक सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांच्या ताब्यात आला आहे. कारखान्याच्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये सभासदांनी भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीच्या पॅनेलला कौल दिला. संचालक पदाच्या एकूण 21 जागांपैकी बहुसंख्य जागांवर लोकसेवा आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून अनेक ठिकाणी विजय देखील झाले आहेत.

        वय वर्ष 82 असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवून कारखान्याची सत्ता त्यांच्या ताब्यात दिली. मुरकुटे यांच्या लोकसेवा पॅनलला ससाणे गट तसेच विखे गटाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तर एडवोकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी शेतकरी संघटनेच्या पॅनलला अदिक गट व कानडे गटाचा पाठिंबा होता.