शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात इंडो-तिबेट सैनिक तैनात; तगडा बंदोबस्त...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात इंडो-तिबेट सैनिक तैनात; तगडा बंदोबस्त...

श्रीरामपुरात इंडो-तिबेट सैनिक तैनात; तगडा बंदोबस्त...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान शांततेच्या आणि निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी श्रीरामपुरात 'आयटीबीपी' म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसचे १०० जवान दाखल झाले आहेत.

      मतदानाच्या दोन दिवस अगोदरपासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ०२ ड्रोनच्या माध्यमातून ठिकठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. आयटीबीपीच्या १०० जवानांसह २०० पोलीस, ३०० होमगार्ड या बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. 

शिवाय १० पोलीस अधिकारी त्यात २ पोलीस निरीक्षक, ८ एपीआय, पीएसआय यांचा समावेश राहणार आहे. ४ वाहनं बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेली आहे अशी माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. मतदानाच्या दोन दिवस अगोदरपासून हा सर्व पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून मतदान है शांततेत आणि निर्भय वातावरणात व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

     श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात कोणता परिसर हा संवेदनशिल आहे तसेच कोणत्या परिसरातील मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाने या अगोदरच घेतलेली आहे. त्यामुळे संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्राच्या परिसरात पोलीस प्रशासनाचे मतदानाच्या काळात विशेष लक्ष राहणार आहे.