शिवप्रहार न्युज - १४ व्या दिवशी आंदोलनास कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनसह राष्ट्रवादी,महानुभव पंथाचा पाठिंबा...
१४ व्या दिवशी आंदोलनास कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनसह राष्ट्रवादी,महानुभव पंथाचा पाठिंबा...
श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त श्री.प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहारप्रमुख,माजी PSI श्री.सुरजभाई आगे,कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
आज गुरुवारी आंदोलनाच्या १४ व्या दिवशी महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार थोरात,जिल्हाध्यक्ष कैलासराव विखे पाटील यांच्यासह वैभव गायकवाड,सुधीर पठारे,राजेंद्र गोरे,संदीप खर्डे,अमोल निमसे,सोमनाथ भालेराव,हेमंत वाणी यांनी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले.तसेच आजच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मा. सरपंच अविनाश पवार,मा.सरपंच शिवाजीराव शेजुळ,अर्जुनराव खरात पा, नानासाहेब तुपे, संतोष गायकवाड, आबासाहेब खरात पा. विनायक शेजुळ, मोईनुद्दीन पटेल,आयुब पठाण, भगीरथ जाधव,माधव ओहोळ,दगडू डांगे पाटील, तोहिद शेख यांच्यासह खोकरचे प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाटील जाधव तसेच महानुभव पंथाचे नरेंद्रमुनी महाराज,जयेशमुनी महाराज,दिंव्यांश महाराज,मनोहरमुनी महाराज अदिंनी प्रत्यक्ष येवुन पाठिंबा दिला.
दिवसेंदिवस या बिगरराजकीय जनआंदोलनाला सर्वस्तरातुन पाठिंबा प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे.