शिवप्रहार न्यूज- ०६ गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडा मा.आ.मुरकुटे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी…

शिवप्रहार न्यूज- ०६ गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडा मा.आ.मुरकुटे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी…

०६ गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडा मा.आ.मुरकुटे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी…

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द, कडीत बुद्रुक, मांडवे ,कुरणपूर,गळनिंब,फत्याबाद ही गावे वर्षानुवर्षांपासून लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली आहे.

      परंतु या गावांचा तालुका श्रीरामपूर असून श्रीरामपूर हेच या गावातल्या लोकांसाठी सोयीचे ठिकाण असल्यामुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ही गावे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला जोडण्यासाठी मागणी केली आहे.

       यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे समजते.