शिवप्रहार न्यूज- अत्याचार करणाऱ्या म्हाताऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा…
अत्याचार करणाऱ्या म्हाताऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा…
अकोले जि.नगर - स्वतःच्या पोटच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या म्हाताऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वाय.एच.मनाठकर यांनी नुकतीच सुनावली आहे.
अकोले तालुक्यातील मुलीच्या बापाने स्वत:च्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.दरम्यान न्यायालयाने साक्षी-पुरावे तपासले असता साक्षी पुराव्यांच्या तपासणीअंती आरोपी म्हातार्याला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
या पुराव्यांमध्ये डीएनए पुराव्याचा देखील समावेश आहे.त्यावेळी पीडित मुलीने एका खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता.मात्र जन्मलेल्या बाळाची परिस्थिती नाजूक असल्याने त्याचा त्याचवेळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
राजुर पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल व न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे अकोले तालुक्यातून स्वागत होत आहे.