शिवप्रहार न्यूज- एक कोटी दे नाहीतर तुझा खून करू ! नेत्याला धमकी !
एक कोटी दे नाहीतर तुझा खून करू ! नेत्याला धमकी !
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्यूज )- रिपाईचे नेते राजाभाऊ कापसे यांना एक कोटीची खंडणी मागत खून करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी काल राजू नाथा कापसे ,धंदा सामाजिक कार्य ,हल्ली रा.- श्रीरामपूर, मुळ राहणार-वाकडी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
यात म्हटले आहे की,आरोपी मोबाईल नंबर 79 20 15 42 876 व 97 300 28 631 या नंबर वरील आरोपीने कापसे यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून “तू एक कोटी रुपये खंडणी दे नाहीतर तुला जीवे ठार मारू अशी मोबाईलवर खंडणी मागून खंडणी दिली नाही तर खून करण्याची धमकी दिली” या प्रकरणी कापसे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात वरील दोन मोबाईल धारक आरोपीविरुद्ध भादवि कलम 387 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोरसे हे पुढील तपास करीत आहे.
सामाजिक कार्य करणारे रिपाईचे नेते असलेले कापसे यांना खंडणी मागत धमकी देण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.