शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडले...
श्रीरामपुरात कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडले...
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये राहणारा आरोपी फिरोज मुसा कुरेशी याने कत्तल करण्याच्या प्रयोजनासाठी पाच गोवंश जातीची जनावरे आणली होती.
त्याने ही गोवंश जनावरे दुसरा आरोपी करण कांबळे यांच्या ताब्यात घेऊन टिळकनगर भागात एका भिंतीलगत हे गोवंश आतिशय निर्दयतेने बांधून ठेवले तसेच त्यांची चारा-पाण्याची देखील काही सोय केली नाही.
या घटनेवरून वरील आरोपींविरुद्ध श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयातील पोलीस शिपाई नितीन चव्हाण यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 473/ 2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंधक अधिनियम या कायद्याखाली काल रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुढील तपास पोलिस नाईक राशिनकर हे करीत आहेत.