शिवप्रहार न्यूज- नेवाशाच्या तरुणाने पुण्याच्या प्रियसीच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळुन राहुरी फॅक्टरीला घेतला गळफास;गुन्हा दाखल....
नेवाशाच्या तरुणाने पुण्याच्या प्रियसीच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळुन राहुरी फॅक्टरीला घेतला गळफास;गुन्हा दाखल....
राहुरी
(शहर प्रतिनिधी)
तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे पुण्याच्या प्रियसीच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून नेवाशाच्या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली असुन मुलीच्या आई-बापासह इतरांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील सुरेश कांतीलाल गायकवाड, वय 25 , याचे व विशाखा राजू वाघमारे रा-येवलेवाडी,पुणे यांचे प्रेम संबंध होते दोघे लग्नही करणार होते.परंतु याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना कळाली त्यानंतर आरोपी ०१) राजू बिभीशन वाघमारे, ०२)उज्वला राजू वाघमारे, ०३)स्वाती राजेंद्र मोरे तिघे राहणार- कोंढवा हॉस्पिटल जवळ, येवले वाडी ,तालुका -हवेली, जिल्हा -पुणे , ०४)योगेश मोतीलाल गायकवाड राहणार-मक्तापूर तालुका-नेवासा यांनी संगनमत करून मयत सुरेश गायकवाडला मारहाण करून घरातून काढून दिले व फोन करून तूझे व विशाखा हिचे संभाषण डिलीट कर असे बोलून नेहमी शिवीगाळ करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मयत सुरेश यास मानसिक त्रास देऊन त्यास गळफास घेऊन आत्महत्या करण्यास कारणीभूत झाले म्हणुन याप्रकरणी मुलाचे वडील कांतीलाल श्यामलाल गायकवाड राहणार-मक्तापूर, तालुका -नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुरनंबर 328/2021 भा दं वि कलम 306 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोसई शेळके हे करीत आहेत.