शिवप्रहार न्यूज- भंडारदारा परिसरात गाडीसह दोघांचा बुडून मृत्यू ;एक जण वाहून गेला…
भंडारदारा परिसरात गाडीसह दोघांचा बुडून मृत्यू ;एक जण वाहून गेला…
राजूर /प्रतिनिधी - भंडारदरा -कळसुबाई रस्त्यावर पेंडशेत फाट्यावर भंडारदराकडे येत असताना जि.संभाजीनगर येथील पर्यटकाच्या गाडीला काल रात्री साडेसात वाजता अपघात झाला.वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवती नदीच्या पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटातील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
अपघातानंतर मदतीसाठी आलेलाएक तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावती नदीत वाहून गेला. याबाबत राजुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जि.संभाजीनगर येथील वकिली पेशाशी निगडित दोन युवक पर्यटनासाठी भंडारादराला आले होते.दिवसभर भंडारदरा निसर्गात फिरल्यावर रात्री साडेसात वाजता ते कळसुबाई कडून भंडारदाराच्या दिशाने येत होते.या यावेळी पेंडशेत फाट्यावर एक अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटाकार थेट कृष्णवती नदी पात्र बुडाली.कार बुडत असताना मागून दुसऱ्या वाहनाने आलेला युवक मदतीसाठी थांबला.परंतु नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो ही नदीपात्र वाहून गेला.
ही घटना परिसरातील शेंडी येथील राजीव बनसोडे,दीपक आढाव या दोघांनी पाहिली.त्यांनी तात्काळ राजुर पोलिसांना फोन केला.राजुर पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य हातात घेत ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजता अपघात ग्रस्त क्रेटा नदीपात्रातून बाहेर काढली . वळणाच्या ठिकाणी पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही याच कारणामुळे तिन्ही मुलांना जीव गमावा लागला.
रात्री उशिरापर्यंत मदत कार्यात अडथळे होत असल्यानेआज सकाळपासून राजुर पोलीस स्टेशनचे स.पो नि. नरेंद्र साबळे ,पो कॉ. अशोक गाडे ,पो. कॉ डगळेंसह सर्व कर्मचारी वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत आहे.