शिवप्रहार न्यूज- कोपरगावातुन दोन अल्पवयीन मुलींना पळवले; एक श्रीरामपुरात सापडली तर दुसरीचा कसुन शोध सुरू

शिवप्रहार न्यूज- कोपरगावातुन दोन अल्पवयीन मुलींना पळवले; एक श्रीरामपुरात सापडली तर दुसरीचा कसुन शोध सुरू

कोपरगावातुन दोन अल्पवयीन मुलींना पळवले; एक श्रीरामपुरात सापडली तर दुसरीचा कसुन शोध सुरू ...

कोपरगाव- कोपरगाव तालुक्यातील बोलकी या गावातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले म्हणून मुलीच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 140 /2021 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या दुसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील  शहजापूर या गावातून एका 14 वर्षे अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवलेली मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार केली म्हणून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 142 /2021 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना बोलकी या गावातून पळून नेलेली मुलगी श्रीरामपूर शहरातल्या एमआयडीसी परिसरात तिच्या मामाच्या घरी सापडली आहे.पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिचे आणि  तिच्या आईचे वाद झाल्यामुळे ती घरातून निघून गेली होती तरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कोपरगावला नेले असून पुढील कार्यवाही चालू आहे. तर शहजापूर इथल्या मुलीचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.दौलतराव जाधव यांनी दिली आहे.