शिवप्रहार न्यूज- सोनईजवळ सोनारास लुटणारा आरोपी श्रीरामपूर शहरात पकडला…

शिवप्रहार न्यूज- सोनईजवळ सोनारास लुटणारा आरोपी श्रीरामपूर शहरात पकडला…

सोनईजवळ सोनारास लुटणारा आरोपी श्रीरामपूर शहरात पकडला…

सोनई - परिसरातील जबरी चोरी गुन्हयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपुरातून पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २१/०१/२०२० रोजी फिर्यादी निखील बाळासाहेब आंबिलवादे, वय २१, धंदा सराफ दुकान, रा. खेडले परमानंद, सोनई, ता. नेवासा हे ज्वेलर्सचे दुकान बंद करून, दुकानातधील दागिने चैनी बॅगमध्ये भरुन घरी जाण्याच्या तयारीत असतांना मोटार सायकलवरील अज्ञात तीन चोरटयांनी फिर्यादीस पत्ता विचारण्याचा बहाणा करुन, डोळ्यात मिरचीपुड टाकुन फिर्यादीचे पाठीवर असलेली सोन्याचांदीचे दागिण्यांची बॅग बळजबरीने ओढून चोरुन घेवून गेले.      

         सदर घटनेबाबत सोनई पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३ / २०२० भादविक ३९४ ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी फरार होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबत पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि अनिल कटके यांनी एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार यांना फरार असलेल्या व पाहिजे आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबत सूचना दिल्याने सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेका बापू फोलाणे, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना भिमराज खर्से, रवि सोनटक्के, पोकॉ मच्छिद्र बडे, चापोहेकॉ बबन बेरड अशांनी मिळून श्रीरामपूर परिसरात पेट्रोलिंग करत आरोपींचा शोध घेत असतांना पोनि अनिल कटके यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे विजय देडगांवकर हा त्याचा मुळ पत्ता कोल्हार बु., ता. राहाता येथे राहत नसुन तो सध्या सुर्यानगर, ता. श्रीरामपूर येथे आहे. 

      अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर पथक बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवून आरोपी चे राहते घराचे परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने, त्याचे नाव विजय रामकृष्ण देडगांवकर, रा. सुर्यानगर, वार्ड नं. ७, ता. श्रीरामपूर असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन सोनई पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी विजय रामकृष्ण देडगांवकर, रा. सुर्यानगर, ता. श्रीरामपूर हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुद्ध नगर व पुणे जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी व फसवणुकीचे एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई एसपी मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डिवायएसपी संदीप मिटके, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.