शिवप्रहार न्यूज -आज संध्याकाळी सद्दाम शहाने केला वार्ड नं.०१ मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल..

शिवप्रहार न्यूज -आज संध्याकाळी सद्दाम शहाने केला वार्ड नं.०१ मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल..

आज संध्याकाळी सद्दाम शहाने केला वार्ड नं.०१ मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग;श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो गुन्हा दाखल...


श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील रामनगर,वार्ड नंबर ०१ या भागात राहणारा आरोपी सद्दाम रशीद शहा,वय ३२ वर्षे, व्यवसाय- भंगारवाला याने आज दिनांक १० जून २०२१ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता च्या सुमारास रामनगर येथे एका टपरी मध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून, मिठी मारून विनयभंग केला आणि आरोपी सद्दाम शहा त्या ठिकाणाहुन पळून गेला.
        या घटनेनंतर तात्काळ मुलीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी सद्दाम शहाच्या विरोधात तक्रार दिली.त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 358/2021 भादवि कलम 354,कलम 08 पॉक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपी सद्दाम रशीद शहा याला तात्काळ अटक केली आहे.या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस  निरीक्षक श्री.संभाजी पाटील हे करीत आहेत. 
      अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे रामनगर,वार्ड नंबर ०१ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.यावेळी पोलीस स्टेशन ला हिंदुत्ववादी तरुण जमा झाले होते.