शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरच्या कोवीड सेंटर विरोधात महिलेची आरोग्यमंत्री कडे तक्रार...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरच्या कोवीड सेंटर विरोधात महिलेची आरोग्यमंत्री कडे तक्रार...

श्रीरामपूरच्या कोवीड सेंटर विरोधात महिलेची आरोग्यमंत्री कडे तक्रार...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील सुषमा प्रतापसिंह चंदेले,राहणार- वार्ड नंबर 7 ,मोरगे वस्ती, श्रीरामपूर यांना एप्रिल 2021 मध्ये कोरोना झाला होता.त्यामुळे त्या श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. 

        त्यावेळी त्यांच्या उपचाराचा खर्च दोन लाख 44 हजार रुपये एवढा आला होता. फक्त पंधरा दिवस उपचार केले त्याचा एवढा मोठा खर्च /बील कसे काय ? म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

         तसेच श्रीरामपूर शहरातील या कोवीड सेंटरमध्ये अनेक रुग्णांकडून असेच भरमसाठ बिल घेतल्याची माहितीही त्यांच्या अर्जामध्ये नमूद आहे.

        कोरोना काळात काही लोकांनी गोर-गरीब,जनसामान्यांची मोठी लूट केली आहे .