शिवप्रहार न्यूज- बोधेगावचे माजी सरपंच छबुराव शिंदे यांचे दुःखद निधन…

शिवप्रहार न्यूज- बोधेगावचे माजी सरपंच छबुराव शिंदे यांचे दुःखद निधन…

बोधेगावचे माजी सरपंच छबुराव शिंदे यांचे दुःखद निधन…

 बोधेगाव- दि.12/2/2022 रोजी सकाळी 9-30 वाजता बोधेगाव चे माजी सरपंच छबुराव यादव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी दीड वाजता त्यांचा अंत्यविधी झाला. या अंत्यविधित खूप नावीन्य होत. 

       हिंदू, ख्रिचन, बौद्ध, मुस्लिम या चारही धर्माचे भजनी मंडळी याठिकाणी उपस्तीत होत्या.सर्व जण छबुरव शिंदे यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भजन करत होते. नातेवाईक पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यविधी साठी मोठी गर्दी केली होती.शिंदे साहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेजारील गावातील बॅंड वल्यानी सुद्धा उस्फुर्त अंत्यविधीच्या समोर मनाने अंत्यविधी ची मिरवणूक काढली. अंत्यविधी ची मिरवणूक बघून सर्व गावकरी गहिवरून गेले. 

       अंत्यविधी नंतर श्रीरापूर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे,

जिल्हा बॅंक मा. संचालक रामभाऊ लिप्टे,पढेगावचे सरपंच किशोर बनकर,रयत बॅंक चे मा. डायरेक्टर राजेंद्र शिंदे. बनसोडे सर, उंडे सर यांनी श्रध्दाजली वाहिली.छबुरव शिंदे यांच्या नंतर पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.