शिवप्रहार न्यूज- माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणत तरुणीचा विनयभंग...
माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणत तरुणीचा विनयभंग...
लोणी - लोणी बुद्रुक गावातील एक तरुणी तिच्या लग्नाचे आमंत्रण नातेवाईकांना देऊन घरी परतत असताना आरोपी तरुणाने तू माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लोणी बुद्रुक गावातील एक 29 वर्षीय तरुणी म्हस्के वस्ती रस्त्यावरून जात असताना तेथे आरोपी अमोल आबासाहेब अंत्रे, वय 30 वर्षे,राहणार- सोनगाव,तालुका राहुरी याने मोटरसायकलवरून येवुन तरुणीच्या स्कुटीला मोटरसायकल आडवी लावली.
त्यानंतर तरुणीचा हात धरून “तू जर माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होवु देणार नाही.मी माझे किंवा तुझ्या जीवाचे काहीपण बरे वाईट करून टाकीन” अशी धमकी दिली आणि तरुणीचा विनयभंग केला.
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.या घटनेमुळे लोणी परिसरात खळबळ उडाली आहे.