शिवप्रहार न्युज-श्रीरामपुरात रेमडेसीवर इंजेक्शन चा काळा बाजार 

शिवप्रहार न्युज-श्रीरामपुरात रेमडेसीवर इंजेक्शन चा काळा बाजार 

शिवप्रहार न्युज-श्रीरामपुरात रेमडेसीवर इंजेक्शन चा काळा बाजार 


श्रीरामपुर-राज्यात कोरोना रुग्णांची प्रचंड वाढ झाली असून श्रीरामपुरात देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
अश्या या संकटकाळात देखील काही लोक मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना रुग्णासाठी लागणारे रेमेडीसीवीर इंजेक्शन श्रीरामपुरात काळ्या बाजारात  अवाच्या सव्वा दराने विकले जात आहे.
४८०० रुपये किंमत असलेल्या ह्या इंजेक्शनचा काळ्या बाजारातील भाव १५ ते २० हजार रुपये इतका आहे .
ज्यांच्याकडे मोठा पैसा आहे ते लोक हे इंजेक्शन सहज घेवु शकतात. परंतु गोर-गरीब कोरोना रुग्ण एवढे पैसे कोठून आणणार ? अशांनी गप गुमान मरणाला मिठी मारायची का ? 
           प्रशाशानाने या काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे,काळा बाजार नेमका कोठे होतो,किती रेमडेसीवीर
इंजेक्शन वाटली गेली,कोणाकडे किती साठा शिल्लक आहे,या साखळीत कोण-कोण सामील आहे याची चौकशी व्हावी.
      आजच पुण्यामध्ये ४ जणांवर रेमडेसीवीर चा काळा बाजार केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी कारवाई श्रीरामपुरातील काळा बाजार करणाऱ्यांवर होईल का ?