शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात एकाला तलवारीसह पकडले...
श्रीरामपुरात एकाला तलवारीसह पकडले...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागातील दशमेश चौक येथे एका तरुणाला पोलिसांनी तलवारीसह पकडल्याची घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पवार यांना आरोपी मनोज नवनाथ इंगळे,वय 32 वर्षे,राहणार -गोंधवणी रोड,वॉर्ड नंबर 1,श्रीरामपूर याच्याकडे एक धारदार व टोकदार अशी तलवार विनापरवाना बेकायदेशीररीत्या मिळून आल्याने याप्रकरणी त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 517/2021 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिघे हे करीत आहेत.
तसेच पोलिसांनी तात्काळ यातील आरोपी मनोज इंगळे याला अटक देखील काल रात्री केली आहे.