शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा सत्कार...

Engineering day

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा सत्कार...

श्रीरामपुरात अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा सत्कार...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील श्री.रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने आज 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन हा भारतभर “अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

          यानिमित्ताने श्रीरामपूर परिसरातील अभियंता क्षेत्रात विशेष जनहिताचे कार्य करणाऱ्या आदर्श अभियंत्यांचा सत्कार रेणुकामाता बँकेचे मॅनेजर रामेश्वर स्वामी, त्रिभुवन तोडकर ,सुरज नेटके ,अमोल विधाते,मीनाक्षी शिंदे ,विनोद नागरे यांच्या कडून हा सत्कार-सन्मान आदर्श अभियंत्यांचा करण्यात आला.

        याप्रसंगी श्रीरामपूर शहरातील प्रथितयश अभियंते श्री.के.के.आव्हाड, श्री.नितीन चौधरी,श्री.संजय देशमुख, श्री.विशाल साळुंखे,श्री.उमेश कांबळे,श्री.विजय शिंपी,श्री.चंद्रकांत परदेशी,श्री भाऊसाहेब वाघ, श्री.ऋषिकेश बोराडे व श्री.प्रशांत भोसले यांचा सन्मान बँकेच्या वतीने करण्यात आला.