शिवप्रहार न्यूज- “शिवप्रहार” कडून गोशाळेत चारा दान;शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपला...

शिवप्रहार न्यूज- “शिवप्रहार” कडून गोशाळेत चारा दान;शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपला...

“शिवप्रहार” कडून गोशाळेत चारा दान;शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपला...

 श्रीरामपूर- उत्तर नगर जिल्ह्यात शिवछत्रपतींच्या अठरापगड जातींना एकत्र करणार्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असणारे संघटन म्हणजे शिवप्रहार प्रतिष्ठान होय.

        नुकतेच शिवप्रहार कडून नॉर्दन ब्रांच परिसरातील श्री.माळवे बंधू संचलित गो शाळेला चारा दान करण्यात आला. शिव प्रहार प्रतिष्ठानचे इंजिनिअर प्रशांत भोसले यांच्या शेतातून एक छोटा टेम्पो भरून चारा गो शाळेला दान करण्यात आला.

         युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोशाळा बांधून गायींचे संवर्धन केले होते. तसेच संरक्षण देखील केले होते.शिवछत्रपतींच्या याच विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला अशी माहिती कार्याध्यक्ष चंद्रशेखर(चंदू)आगे यांनी दिली.

        यावेळी इंजिनीयर प्रशांत भोसले, किशोर कुर्हे,राहुल अस्वले,संतोष चव्हाण, गणेश मावळे ,दीपक संत, योगेश सोनार,महेश मंडलिक, उमेश शर्मा,बंटी बाजारे इत्यादी उपस्थित होते.