शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात चोरी...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात चोरी...

श्रीरामपूर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात चोरी...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा भागात बाजार समिती परिसरात असणाऱ्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या कार्यालयातून सरकारी ॲम्बुलन्स वाहनाची स्टेफनी चोरीला गेली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय,श्रीरामपूर या ठिकाणाहून सरकारी वाहन क्रमांक एम एच 12 एफ एस 41 83 या वाहनाची पाच हजार रुपये किमतीची स्टेफनी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून राहुल बाळासाहेब डौले, वय 24 ,धंदा -ड्रायव्हर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन कडून चालू आहे.