शिवप्रहार न्यूज - अमिष दाखवून तरुणीवर शिर्डी,राहुरी परिसरात बलात्कार! दुसऱ्या घटनेत विद्यार्थीनीचा विनयभंग…
अमिष दाखवून तरुणीवर शिर्डी,राहुरी परिसरात बलात्कार! दुसऱ्या घटनेत विद्यार्थीनीचा विनयभंग…
राहुरी (शिवप्रहार न्यूज )- राहुरी तालुक्यातील माहेगाव परिसरात राहणारा आरोपी सागर पवार याने एका तरुणीला लग्नाचे अमीष दाखवून तिच्यावर शिर्डीतील हॉटेल साई नमो पॅलेस येथे नेऊन बलात्कार केला.तसेच आरोपीने पीडित तरुणीवर त्याची राहुरी तालुक्यातील म्हाडुक सेंटर येथील शेतीवर नेऊन तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला . तसेच आरोपी सागर उर्फ सुखदेव नंदू पवार यांने पीडित तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून त्याच्या घरी नेऊन माहेगाव येथे पीडित तरुणीवर बलात्कार केला.
वेळोवेळी बलात्कार केल्याने पीडित तरुणीने यासंबंधी आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता त्याने व त्याच्या नातेवाईकांनी पिडीत तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करून तुझ्याबरोबर कोण लग्न करणार ? परत जर माझ्या मुलाला फोन केला तर तुला जिवंत ठार मारून टाकू असे म्हणत जातीवाचक बोलून जीवे मारण्याची धमकी दिली.पिडीत तरुणीने राहुरी पोलिसात फिर्यादी दिल्यावर आरोपी सागर उर्फ सुखदेव नंदू पवार, संदीप नंदू पवार आरोपी सागरची आई पवार, स्वप्निल पवार, सर्व राहणार- माहेगाव, तालुका राहुरी यांच्या विरुद्ध भादवि कलम ३७६-२(एन) ३२३,५०४,५०६ व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम प्रमाणे ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी शून्याने शिर्डी पोलिसांकडे पाठविल्याचे राहुरी पोलिसांकडून सांगण्यात आले. तरुणीवर राहुरी व शिर्डीत बालात्कर झाला.
दरम्यान दुसऱ्या घटनेत राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपीने तुझा व्हाट्सअप नंबर दे ,तु मला आवडतेस आपण चॅटिंग करू असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून अंगाला हात लावून विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी वसंत,अंकुश व आरोपीची आई अश्विनी,रा -चिंचाळे ,ता राहुरी यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सपोनि बोकील हे पुढील तपास करीत आहे.या घटनेने विद्यार्थिनी-पालक वर्गात खळबळ उडाली आहे .