शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तहसील कार्यालय  परिसरातून पुजारींची मोटरसायकल चोरली...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तहसील कार्यालय  परिसरातून पुजारींची मोटरसायकल चोरली...

श्रीरामपूर तहसील कार्यालय  

परिसरातून पुजारींची मोटरसायकल चोरली...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोडवर असणाऱ्या तहसील कार्यालय परिसरातून श्री श्याम दत्तात्रय पुजारी ,वय 47 वर्ष ,व्यवसाय -शेती ,राहणार बेलापूर खुर्द ,श्रीरामपूर यांची मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.कोणीतरी अज्ञात चोरट्यांना त्यांची स्प्लेंडर मोटर सायकल एम एच 17 AJ 6403 ही मोटरसायकल चोरली.

        या प्रकरणी काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            परवा दिवशी श्रीरामपुर पोलीस ठाण्यात नोवेल्टी केक शॉप,पाटाजवळ या दुकानासमोरुन देखील एक मोटारसायकल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.