शिवप्रहार न्युज - शहरात घरफोडी करून कॉम्प्युटरसह साहित्य व रोकड चोरली...

शिवप्रहार न्युज -  शहरात घरफोडी करून कॉम्प्युटरसह साहित्य व रोकड चोरली...

शहरात घरफोडी करून कॉम्प्युटरसह साहित्य व रोकड चोरली...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७मधील मोरगेवस्ती परिसरात रात्रीतून घरफोडी करून कॉम्प्युटरसह साहित्य व रोकड चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, मोरगेवस्ती येथील गणपती मंदिर रोडवर राहणाऱ्या आरती संजय बोकफोडे यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील एचपी कंपनीचा कॉम्प्युटर सेट,कि-बोर्ड, माऊस, २ चार्जर व रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

       याप्रकरणी आरती बोकफोडे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. तोडमल हे करीत आहेत.